आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे राम: रेल्वे शौचकूपात अडकला आजींचा पाय; 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शौचकूपात अडकलेला पाय आपल्याला दिसत असेल.आजींच्या सुटकेच्या प्रयत्नात असलेले रेल्वे कर्मचारी... - Divya Marathi
शौचकूपात अडकलेला पाय आपल्याला दिसत असेल.आजींच्या सुटकेच्या प्रयत्नात असलेले रेल्वे कर्मचारी...
मुंबई- मुंबईहून गोव्यातील मडगावला चाललेल्या 'कोकणकन्या एक्स्प्रेस' या रेल्वेतून चाललेल्या एका 68 वर्षीय वृद्ध महिलेचा पाय शौचकुपात अडकल्याची विचित्र घटना आज पहाटे घडली. नऊ-दहा तासांच्या प्रयत्नांनतर त्या आजीचा पाय कुपातून बाहेर काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. गॅस कटरने शौच कूप कापून आजींना बाहेर काढण्यात आले.
याबाबतची घटना अशी की, गुरुवारी रात्री ठाण्यातून रबिया शेख या आपल्या पतीसह करमेळला जाण्यासाठी कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये बसल्या. पहाटे रत्नागिरीजवळील खेड येथे त्या रेल्वेत शौचास गेल्या. मात्र, त्यांचा पाय शौचकूपात अडकून बसला. प्रयत्न करूनही त्यांना तेथून पाय काढता येईना. त्यामुळे त्या तशाच अडकून पडल्या. अखेर काही वेळाने पत्नी बाहेर कशी येईना म्हणून पतीने शोधाशोध केली. तेव्हा रबिया शौचकूपात अडकल्याचे लक्षात आले. त्यांनी सहप्रवासी व टीटींना याबाबत माहिती दिली. तेथील लोकांनी रबिया यांचा पाय काढण्याचा प्रयत्न केला मात्र यश येत नव्हते. त्यामुळे रेल्वेतील लोक पुढच्या स्टेशन्सची वाट पाहू लागले.
सकाळी 7 वाजता ही गाडी रत्नागिरी स्थानकात पोहचली. त्यानंतर रेल्वेची यंत्रणा कामाला लागली. दोन तास गाडी थांबवूनही आजीची सुटका होत नव्हती. अखेर या गाडीचा हा डब्बा वेगळा करण्यात आला. त्यानंतर गॅस कटर व अत्याधुनिक साहित्यांनी शौचकूप कापून काढले. यादरम्यान रबिया शेख यांना प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना भुलीचे इंजेक्शन दिले. सकाळी 11 वाजता शौचकूपातून त्यांचा पाय सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, या घटनेने रेल्वेतील सुरक्षा व शौचालयाच्या स्थितीचा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
पुढे पाहा, छायाचित्रातून घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...