आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन, सोनियांनी केला कामतांना फोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी गुरुदास कामत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच पक्षात सक्रिय राहण्याची विनंती केली. - Divya Marathi
आज सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी गुरुदास कामत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच पक्षात सक्रिय राहण्याची विनंती केली.
मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. गुरुदास कामत यांनी पक्षांतर्गत वादाला कंटाळूनच राजकारणातून संन्यास घेतल्याची भावना त्यांच्या समर्थकांची झाली आहे. त्यामुळेच मुंबईतील तब्बल 25 नगरसेवकांनी कामतांच्या संन्यासानंतर राजीनामा देण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, कामत यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सकाळी त्यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते आहे. मात्र, कामत यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे कळते. यानंतर सोनियांनी त्यांना दिल्लीत भेटण्यासाठी पाचारण केल्याचे सूत्रांनी सांगितले. कामत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना मोर्चा न काढण्याचे, राजीनामे न देण्याचे व शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्षचे संजय निरुपम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळूनच कामत यांनी राजकीय संन्यास्त्राचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संजय निरुपम यांच्याविरोधात आता काँग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदारांनी दंड थोपटले आहेत.
काँग्रेस कार्यालयाबाहेर समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन-
गुरूदास कामत यांनी आपला निर्णय मागे घ्यावा व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे या मागणीसाठी त्यांच्या हजारो समर्थकांनी आज दुपारी 12 वाजता नरिमन पॉइंट येथील काँग्रेस कार्यालय, गांधीभवनसमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेस हायकमांडने गुरुदास कामत यांच्याबाबत योग्य निर्णय घेतला नाही आणि त्यांनी आपला राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय कायम ठेवल्यास कामतसमर्थक हजारोंच्या संख्येने आपले राजीनामे देणार असल्याचे समोर येत आहे. सोमवारीही कामत यांच्या समर्थकांनी त्यांच्या चेंबूर येथील निवासाबाहेर शक्तीप्रदर्शन केले होते. हजारहून अधिक कार्यकर्त्यांनी काल दुपारी कामतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत होते.
मुंबई काँग्रेस विभागलीय चार गटात-
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करताना विश्‍वासात न घेताच परस्पर नियुक्त्या केल्याचा आरोप केला आहे. माजी खासदार प्रिया दत्त यांनीही निरूपम यांच्याबाबत हायकमांडकडे तक्रार केली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये आता देवरा गट, कामत गट, प्रिया दत्त गट आणि निरुपम गट अशी गटातटात विभागणी झाली आहे. कामत व दत्त गटांचा विरोध असल्याने संजय निरूपम यांची उचलबांगडी करण्याची राहुल गांधी यांच्यावर दबाव वाढणार आहे.
पुढे वाचा, संजय निरूपम यांच्या उचलबांगडीसाठी प्रयत्न?...
बातम्या आणखी आहेत...