आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांचे मुंबईत निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व विचारवंत अरूण टिकेकर यांचे आज सकाळी मुंबईत राहत्या घरात निधन झाले. ते 71 वर्षाचे होते. मागील काही दिवसापासून टिकेकर यांना श्वसनाचा त्रास होत होता. अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले.
अरूण टिकेकर यांचा थोडक्यात परिचय
- अरूण टिकेकर यांनी लोकसत्ताचे दीर्घकाळ संपादकपद भूषवले. याशिवाय त्यांनी इतर काही वृत्तपत्रात संपादकपद भूषवले आहे.
- टिकेकर यांनी व्यक्तिचित्रे व मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास त्यांनी लेखणीबद्ध केला आहे.
- टिकेकर यांनी शरद पवारांच्या मुलाखतींचे आणि भाषणांचे फास्ट फॉरवर्डमधून संपादन केले.
- टिकेकरांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.
- दिल्ली येथील लायब्ररी ऑफ काँग्रेसमधील भाषातज्ज्ञ म्हणून कार्यरत होते.
- राजकारणातील लोकांवर जी टीका होते, टिप्पणी होते यासंबंधी काही नियमावली हवी अशी त्यांची भावना होती. राजकीय नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने टीका केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा कायदा तयार करावा असेही त्यांना वाटे.
- पत्रकाराने चमकोगिरी न करता लेखन करावे व समाज बदलाला हातभार लावावा अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे इतके व्यासंगी पत्रकार असूनही ते कधीही कोणत्याही वृत्तवाहिन्यांवर चर्चेसाठी सहभागी होत नसत.
- टिकेकर यांची ओळख एक व्यासंगी व पत्रकारितेची मूल्य जोपासणारा प्रामाणिक पत्रकार अशी राहिली.
डॉ. अरूण टिकेकरांच्या निधनाने व्यासंगी पत्रकार, अभ्यासक गमाविला- मुख्यमंत्री
ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरूण टिकेकर यांच्या निधनाने व्यासंगी पत्रकार आणि माहिती व संशोधनपूर्ण लिखाण करणारा अभ्यासक गमाविला असल्याची शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पत्रकारितेतील प्रखर बुद्धीवादाचे पुरस्कर्ते असणारे डॉ. टिकेकर हे चौफेर प्रतिभेचे व्यक्तिमत्व होते. आपल्या सव्यसाची लिखाणाने त्यांनी संपादक पदाला एक उंची प्राप्त करून दिली होती. ते एक अभिजात ग्रंथप्रेमी होते. आधुनिक महाराष्ट्र, मुंबई विद्यापीठ, टाइम्स ऑफ इंडिया आदीबाबतचे त्यांचे इतिहास लेखन त्यांच्यातील संशोधक व चिकित्सक इतिहासकाराची प्रचिती देणारे आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील एक श्रेष्ठ दर्जाचा संपादक आपण गमाविला आहे.