आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ कलाकारांना जानेवारीपासून पेन्शन, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांची घाेषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ व हलाखीची परिस्थिती असलेल्या कलाकारांना येत्या जानेवारीपासून दरमहा पेन्शन सुरू करण्यात येणार असल्याची घाेषणा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी मुंबईत शुक्रवारी केली.

१९९८ पासून ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न रेंगाळला हाेता. त्यामुळे अनेक ज्येष्ठ कलाकारांकडे आैषधाेपचारांसाठीदेखील पैसे नाहीत. त्यामुळे येत्या जानेवारीपासून सुरुवातीला ५० ज्येष्ठ कलाकारांना दरमहा ५०० ते ५५० रुपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. तसेच चित्रपटांना बाॅक्स आॅफिसवर याेग्य न्याय मिळावा, एकाच दिवशी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित करून एकमेकांचे नुकसान निर्मात्यांनी करू नये. तसेच त्यांना महामंडळाकडून देण्यात येणा-या अनुदानाबाबत याेग्य ती माहिती होण्यासाठी निर्मात्यांची कार्यशाळा घेण्याचाही मानस पाटकर यांनी बाेलून दाखवला.

आठ लाखांचा निधी
अभिनेते अतुल अभ्यंकर यांच्या निधनाने कलाकारांच्या चित्रीकरणाच्या वेळा व अनिश्चितता, तसेच वाढणारा ताण याबाबत उपाययाेजना करण्यासाठीही पाऊल उचलणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. या वेळी महामंडळाचे मिलिंद अष्टेकर, प्रसाद सुर्वे, अलका कुबल आदी उपस्थित हाेते. कुबल यांनी या वेळी आपल्या जिव्हाळा या संस्थेतर्फे काेल्हापूर येथील चित्रपटामध्ये काम करणा-या तंत्रज्ञांसाठी उभ्या केलेल्या ३ प्लाॅट्सची जबाबदारी व आठ लाखांचा तंत्रज्ञांसाठी गाेळा केलेला निधी महामंडळाकडे सुपूर्द केला.