आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MTNLच्या सीनिअर ऑफिसरची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीने केला आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (MTNL) वरिष्ठ अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. संजीव राजोरिया (34) असे अधिकार्‍याचे नाव आहे.

संजीव राजोरिया यांनी पवई येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. संजीव राजोरिया हे अंधेरीतील साकीनाका परिसरातील रहिवासी होते. ऑफिसमधील सहकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

राजोरिया यांचा मृतदेह पवईतील एका लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पवई पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. त्यांनी राजोरिया यांचा मोबाइल पोताब्यात घेतला आहे. त्यांच्या घरी तसेच कार्यालयात सुसाईड नोट आढळते का? हेही तपासले जात आहे.

पत्नीने केला आरोप...
ऑफिसातील सहकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा आरोप राजोरियांच्या पत्नीने केला आहे. पोलिसांत त्यांनी लेखी तक्रार दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...