आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ लेखक शं. ना. नवरे उर्फ शन्ना यांचे डोंबिवलीत निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ लेखक, साहित्यिक शं. ना. नवरे यांचे आज (बुधवार) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात नवरे यांची प्राणज्योत मालवली. शंकर नारायण नवरे हे नाव शन्ना म्हणूनच सर्व महाराष्ट्राला परिचित होते.

शं. ना. नवरे हे काही दिवसांपासून आजारी होते. काल संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डोंबिवलीतील लाईफलाईन रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह आणि ‘निवडुंग', 'इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’ या कादंबर्‍याही प्रसिद्ध आहेत. ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय’ ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. लेखक, नाटककार, कथाकार म्हणून त्यांची ओळख होती.