आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धापकाळाचे पेन्शन सरसकट हवी : आढाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वृद्धापकाळाच्या निवृत्तिवेतनासाठी दारिद्रय़रेषेचा निकष रद्द करून या योजनेचे सार्वत्रिकीकरण करावे, अशी मागणी हमाल पंचायतचे संस्थापक बाबा आढाव यांनी शनिवारी मुंबईत केली. त्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे रविवारी पेन्शन परिषदेच्या वतीने धरणे धरण्यात येणार आहेत.

आढाव म्हणाले, देशात 93 टक्के कामगार असंघटित क्षेत्रात असून त्यांना कुठलीही सामाजिक सुरक्षितता नाही. निराधार, विधवा, अपंग यांच्यासाठी केंद्राच्या विविध पेन्शन योजना आहेत. मात्र, त्यासाठी दारिद्रय़रेषेचा निकष आहे. त्यामुळे त्याचे लाभार्थी अत्यल्प आहेत. अशा कामगारांना यापुढे कोणत्याही परिस्थितीत हा फायदा मिळलाच पाहिजे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

शेतमजुरांना फायदा
पेन्शन योजनेचे सार्वत्रिकीकरण केल्यास 21 कोटी शेतमजूर, 4 कोटी मच्छीमार, 4 कोटी खाणकामगार आणि 4 कोटी बांधकाम मजुरांना सामाजिक न्याय मिळू शकतो, असा दावाही आढाव यांनी केला.

पेन्शन सरसकट लागू करण्यास केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती आढाव यांनी या वेळी दिली.

तरतूद करा - ‘अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातही वृद्धांना सरसकट पेन्शन देण्यात येते. केंद्र सरकारने वृद्धांच्या पेन्शनची घटनात्मक तरतूद करणे आवश्यक आहे.’’ बाबा आढाव, संस्थापक, हमाल पंचायत