आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची २५८ अंकांनी अापटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक बाजारातील नरमाई, कंपन्यांची तिमाहीतील खराब अार्थिक कामगिरी अाणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी २५८.५३ अंकांनी घसरून २८,११२.३१ अंकांच्या दाेन अाठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

बहुराष्ट्रीय कंपन्या अाणि ग्राहकाेपयाेगी वस्तू कंपन्यांचे समभाग वगळता अन्य सर्व क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक पातळीवर गेल्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक २५८.५३ अंकांनी घसरून २८,११२.३१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दाेन दिवसांत सेन्सेक्स ३९२.६२ अंकांनी गडगडला अाहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकदेखील ६८.२५ अंकांनी घसरून ८५२१.५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. साप्ताहिक अाधारावर सेन्सेक्स अाणि निफ्टीमध्ये अनुक्रमे ३५१ अाणि ८८.३० अंकांनी घट झाली अाहे. संसदेच्या अधिवेशनाच्या जीएसटीसारख्या सुधारणा विधेयकांबद्दल फारशी काही प्रगती न झाल्यामुळेदेखील गुंतवणूकदारांच्या चिता वाढवल्या अाहेत.