आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Separate Post Office Will Be Set Up For Women In Aurangabad

अर्धे विश्‍व: औरंगाबादेत महिलांचे स्वतंत्र टपाल कार्यालय होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टपाल विभागाला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारने 4 हजार 900 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत औरंगाबाद, नागपुरसह देशातील प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येकी 1 महिला टपाल घर उघडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के. सी. मिश्र
यांनी दिली.

मंगळवारपासून टपाल सप्ताह सुरू झाला आहे. याच धर्तीवर मिश्र यांनी ही माहिती दिली. टपाल खाते सध्या वेगाने तोटा भरून काढत असल्याचेही ते म्हणाले

मनरेगाचे मानधन टपाल खात्यातून

रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणा-या मजुराचे मानधनही आता टपाल खात्यामार्फत केले जाणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात टपाल खात्याचे सर्वात मोठे जाळे असून 12 हजार 596 टपाल कार्यालये या भागात कार्यरत आहेत. टपाल खात्याकडे नोंदणी असणा-या मनरेगा खातेदारांची संख्या 31 लाख 80 हजार आहे.