आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serious Allegation On Deputy Superitendent Of Police : High Court

उपअधीक्षक सुधाकर पुजारींवरील आरोप गंभीर : हायकोर्ट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईचे पोलिस उपअधीक्षक सुधाकर पुजारी यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचा आरोप गंभीर असल्याचे मत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. त्यामुळे पुजारी यांचा 2001 पासूनचा वार्षिक गोपनीय अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

पुजारी यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचे यापूर्वीच्या अहवालांमधून निष्पन्न झाले आहे. तरीही त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही. या दिरंगाईस जबाबदार असणा-या पोलिस व गृह विभागाच्या अधिका-यांविरोधात कारवाई करावी. तसेच, पुजारी यांना निलंबित करावे, अशी मागणी करणारी याचिका अ‍ॅम्नेस्टी अँड रिडम्प्शन ऑ र्गनायझेशन इंटरनॅशनल ट्रस्ट संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दीपक कवितकर व अविनाश सणस यांनी दाखल केली आहे. त्या वेळी 2001मध्ये सहपोलिस आयुक्तांनी पुजारी यांच्या विरोधातील आरोपांची चौकशी करण्याची विनंती करणारे पत्र पोलिस आयुक्तांना लिहिले होते. ते नेमके कशाच्या आधारे लिहिले होते, याची माहिती द्यावी. कारण, पुजारी यांच्या विरोधातील आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. ते सर्वसाधारण स्वरुपाचे नाहीत, असे मत व्यक्त करत न्यायालयाने या वेळी राज्य सरकारची झाडाझडती घेतली.