आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Setback For Mumbai University Vice chancellor Rajan Welukar

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर यांना पद सोडण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांना पदावरुन दुर होण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले, की यापुढे अशा महत्त्वाच्या पदांबाबतचा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला जाणार नाही.
कुलगुरु राजन वेळुकर यांचा कार्यकाळ सुरुवातीपासून वादग्रस्त राहिला आहे. राज्यपाल आणि कुलपती सी.विद्यासागर राव यांनी आज (गुरुवार) त्यांना पदावरुन दूर होण्याचे आदेश दिले. प्रभारी कुलगुरु म्हणून नरेशचंद्र यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. या प्रकरणावर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, 'यापुढे शैक्षणिक पात्रतेनुसारच कोणाचीही नियुक्ती केली जाईल. अशा महत्त्वाच्या पदांचा निर्णय राजकीय दबावापुढे घेतला जाणार नाही.'

काय आहे प्रकरण
माजी कुलगुरु ए.डी.सावंत यांनी डॉ.राजन वेळूकरांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. नंतर यांनी यासंदर्भात एक याचिका हायकोर्टात दाखल केली होती. कुलगुरु निवडीच्या निकषांची पूर्तता करण्याची पात्रता नसतानाही निवड समितीने डॉ.राजन वेळूकर यांची नियुक्ती केल्याचे सावंत यांनी याचिकेत म्हटले होते. यावर डिसेंब्र 2014 मध्ये सुनावणी करताना हायकोर्टाने डॉ.वेळूकर यांनां मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अपात्र ठरवले होते. तसेच ही नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाल्याचे म्हटले.
दरम्यान, डॉ.राजन वेळूकर यांच्या कुलगुरुपदाची कारकीर्द अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यात पद सोडण्याची नामुष्की डॉ.वेळूकरांवर आली आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतरही डॉ.वेळूकर यांनी पद सोडले नव्हते त्यामुळे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी आज त्यांना पद सोडण्याचे आदेश दिले.