आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभागातून वाचवले २६०० एकर जंगल, रत्नागिरीत कम्युनिटी बेस्ड फॉरेस्ट कन्झर्व्हेशन उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विकासाचा वाढता रेटा आणि वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जगभर जंगले तोडली जात आहेत. एक जंगल नैसर्गिकरीत्या तयार होण्यासाठी शेकडो वर्षे जावी लागतात, (लोकसहभागातून जंगल संरक्षण) हा उपक्रम यशस्वी केला आहे. 

गेल्या ८ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून एईआरएफने २६०० एकर जंगल तुटण्यापासून वाचवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जपानमधील ‘डायकिन कंपनी’तर्फे एईआरएफसोबत जंगल संरक्षणाचे नवीन करारही करण्यात येणार आहेत. पश्चिम घाटाला युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळाले, तेव्हापासून देशात आणि राज्यातही पश्चिम घाटाविषयी चर्चा सुरू झाली. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या चारही राज्यांत असणाऱ्या पश्चिम घाटाचे क्षेत्र तेथील अधिक संख्येने असणाऱ्या नॅशनल पार्क आणि अभयारण्यांमुळे तुलनेने संरक्षित आहे. मात्र, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचे आणि विशेषत: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र तेथील खासगी मालकींमुळे पूर्णत: असंरक्षित व असुरक्षित आहे. त्यातही कोकणातील बहुतेक डोंगर खासगी मालकीचे आहेत. त्यामुळे कारखान्याचे बॉयलर्स पेटते ठेवणाऱ्या लाकडाला मोठी मागणी आहे. 

कोकणातील या असंरक्षित खासगी जमिनींच्या मालकांना थोड्या पैशाचे आमिष देऊन ठेकेदार ही जंगले उजाड बनवत आहेत. या पार्श्वभूमीवर एईआरएफ संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळच्या परिसरात आठ वर्षांपूर्वी ‘कम्युनिटी बेस्ड फॉरेस्ट कन्झर्वेशन’चे काम सुरू केले. येथील अंबवणी गावातील बोंद्रे कुटुंबीयांशी पहिला जंगल संरक्षण करार करण्यात आला. हळूहळू हे क्षेत्र वाढत गेले. काही कुुटुंबे स्वत:हून संस्थेकडे आली. जंगल राखून मिळणारे फायदे अधिक असल्याचे त्यांना सिद्ध करून दाखवले आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून आजमितीला २६०० एकर जमिनीवरील जंगल लोकसहभागातून २०२३ पर्यंत संरक्षित केले आहे, अशी माहिती अर्चना गोडबोले यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

आठ वर्षांपासून प्रयत्न
गेल्या आठ वर्षांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, ग्रामस्थांचा वाढता सहभाग, वनविभागाचे सहकार्य आणि ज्ञात-अज्ञात मंडळींनी केलेली सर्व प्रकारची मदत, यामुळेच लोकसहभागातून जंगल संरक्षण, हा उपक्रम जोम धरत आहे. येत्या दोन वर्षांत अजून दोन हजार एकर जंगल तोडण्यापासून  वाचवण्याचे आमचे ध्येय आहे.
- अर्चना गोडबोले,  संचालक,  एईआरएफ
बातम्या आणखी आहेत...