आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex Determination Charge Against Sharukh Not Fair

शाहरुखवरील गर्भलिंग निदानाचे आरोप निराधार, मुंबई मनपाची उच्च न्यायालयात माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी शाहरुख खान व त्याची पत्नी गौरी यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात सांगितले.

न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून खान दांपत्यांनी सरोगसीच्या माध्यमातून मुलाला जन्म दिल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. याप्ररकणी सत्र न्यायालयाने 8 ऑगस्ट रोजी शाहरुखला समन्स बजावले होते. त्यानंतर पालिकेने समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली. गुरुवारी झालेल्या सुनावणीत पालिकेचे सदस्य एम.पी. एस. राव यांनी न्यायालयात सांगितले, खान दांपत्यावर देशपांडे यांनी केलेल्या आरोपाला कोणताही आधार नाही. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. या प्रकरणाची सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर उच्च न्यायालय दोन आठवड्यांनंतर आपला निकाल देईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच याचिकर्त्याने केवळ वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा आधार दिला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.