आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने मुलींना करायला लावायचा हे काम, अभिनेत्यास अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणींकडून देहव्यापार करुन घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. महुल वाघेला याला ताब्यात घेतले आहे. तो टीव्ही मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करतो. मालाडमधील बांगूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आणि दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते अमित जलान यांना या सेक्स रॅकेटची माहिती मिळताच त्यांनी मुंबई पोलिसांना ही माहिती कळवली.पोलिसांनी खोटे ग्राहक बनून मालाडमधील एका हॉटेलमध्ये या एजंट आणि मुलींना बोलावून घेतले. यात दोन अल्पवयीन मुलींसह काही मॉडेलचा समावेश होता. पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत त्यांची किंमत केली जात होती. पोलिसानी दोन अल्पवयीन मुलींसह एकूम पाच मुलींची सुटका केली आहे. पोस्को आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...