आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्सोव्यात आमदाराच्या घरात सेक्स रॅकेट; पाच तरुणींसह दोन दलाल अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वर्सोवा येथील राजयोग सोसायटीतील एका घरात चालणार्‍या सेक्स रॅकेटचा सोमवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. हे घर आमदारांच्या कोटय़ातील असल्याचे समाजसेवा शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त फिरोज पटेल यांनी सांगितले. पाच तरुणींसह दोन दलालांना पोलिसांनी अटक केले.

वर्सोवा येथील न्यू म्हाडा वसाहतीतील राजयोग सोसायटीतील तिसर्‍या मजल्यावरील घरात छापा टाकून पाच मुलींसह सुप्रिया ठाकूर आणि सतिश शहा या दोन दलालांसह अटक केली. अटकेतील तरुणी टीव्ही मालिका तसेच चित्रपटातही काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीनंतर तरुणींची सुटका करण्यात आली असून दलालांवर ‘पीटा’ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. हे घर नाशिक जिल्हय़ातील एका माजी आमदाराचे असून ते त्यांनी भाड्याने दिले असल्याचे समजते.

यापूर्वीही पोलिसांनी वर्सोवा येथील पोलिस अधिकार्‍याच्या घरात सुरु असलेले सेक्स रॅकेट उघडकीस आणले होते. आणखी काही आमदारांच्या घरात अवैधधंदे सुरु आहेत का?, याचा तपास पोलिस चौकशी करत आहेत.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'आमदाराला सहा कॉलगर्ल्ससह अटक'