आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक अत्याचार, बलात्काराचे गुन्हे अजामीनपात्र होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे लैंगिक अत्याचार आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र करण्याचा प्रस्ताव गृह विभागाने तयार केला असून तो लवकरच मंत्रिमंडळासमोर येईल, असे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महिला सुरक्षेबाबत गृह विभागाने निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या बहुतेक शिफारसी स्वीकारल्या असून त्याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याचे संबंधित अधिका-या ने सांगितले.
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत कडक शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी महिला संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून जोर धरत आहे. त्यामुळे हा गुन्हा अजामीनपात्र करावा याबाबत आर. आर. पाटील यांनी सहमती दर्शवली असून तसा प्रस्ताव गृह विभागाने बनवला आहे. याआधी केंद्र सरकारकडेही हा प्रस्ताव
पाठवण्यात आला आहे.