आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख, आमिर, सलमानच्या सुरक्षेत कपात, मुंबई पोलिसांचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख, सलमान व आमिर खान यांच्यासह आणखी काही बड्या कलाकारांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. शहरातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना पुरवलेल्या सुरक्षेचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने नियमितपणे आढावा घेण्यात येतो. या आढाव्यादरम्यान सिनेसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांना दिलेली सुरक्षा अतिरिक्त असल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी म्हणाले, कलाकारांची सुरक्षा कमी केली असून तो नियमित आढाव्याचा भाग आहे. पोलिसांमार्फत दिल्या जाणाऱ्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जात असतो. परिस्थिती पाहून त्यांची सुरक्षा कमी-जास्त केली जाते. फक्त कलाकारांची सुरक्षाच कमी केली नाही, तर काही बिल्डर्स आणि राजकीय नेत्यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.'

गेल्या वर्षी पुजारी टोळीने अली मोराणी या निर्मात्याच्या घराबाहेर खंडणीसाठी गोळीबार केला होता. त्यानंतर या टोळीने शाहरुख खानलाही धमक्या दिल्या होत्या. या घटनांची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी सिनेसृष्टीतील बड्या कलाकारांना पोलिस संरक्षण दिले होते. शाहरुख, आमिर, सलमान खानसह निर्माता आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, सिनेसृष्टीतील या बड्या कलाकारांच्या जिवाला फारसा धोका नसल्याने पोलिसांनी त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकार असे निर्णय घेत असताना सर्व बाबींचा विचार करत असते. ज्याअर्थी सुरक्षेत कपात केली गेली आहे.त्याअर्थी कलाकारांवरील धोका टळला असावा.
रोहन सिप्पी, निर्माता

सुरक्षा कमी केली तरी हरकत नाही. ज्यांना असुरक्षित वाटते त्यांनी खासगी सुरक्षा रक्षक नेमावेत.
शक्ती कपूर, अभिनेता
बातम्या आणखी आहेत...