आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने भरला दोन लाखांचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मन्नत बंगल्याबाहेर अनधिकृत रॅम्प उभारल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान याने १ लाख ९३ रुपयांचा दंड मुंबई महापालिकेकडे भरणा केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे माहिती मागितली होती. त्यावर उत्तर देताना पालिकेच्या वांद्रे वाॅर्ड अधिकाऱ्याने सांगितले, शाहरुखने गेल्या वर्षीच मार्च महिन्यात १ लाख ९३ हजार रुपयांचा दंड भरला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण बंद करण्यात आले आहे. शाहरुखने त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी अनधिकृत रॅम्प उभारला होता. त्यावर परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर पालिकेकडून त्याला नोटीस पाठवण्यात आली होती.