मुंबई - देश पारतंत्र्यात होता. कामगारांसोबरच दलित, आदिवासी, महिला यांचे प्रचंड शोषण होत होते. अशातच चाळीसच्या दशकात शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या त्रिकुटांनी ढोलकीच्या थापावर अशिक्षित व्यक्तींच्या मनांमध्ये क्रांतीची ज्वाळा पेटवली. पुढे हाच वणवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत पोहोचला. मानवी हक्कांसाठी त्यांनी रान पेटवलंच. पण, संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील मना-मनात मराठी अस्मिता जागी केली. 40 ते 60 दशकापर्यंत कामगार चळवळीतून या त्रिकुटांनी मुंबईवर अधिराज्य गाजवले. यापैकी शहीर अमर शेख यांची आज आज जयंती. त्या अनुषंगाने divyamarathi.com च्या वाचकांसाठी त्यांच्या कार्याविषयी ही खास माहिती....
सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत गरीब कुटुंबात झाला जन्म
बार्शी (जि. सोलापूर) येथील पुष्पा नदीच्या काठी 20 ऑक्टोबर 1916 रोजी एका गरीब मुस्लीम कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. दिवस उजाडला की भाकरीची चिंता असे. त्यामुळेच शाहीर लहानपणापासूनच अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये शाहीर अमर शेख जगायला शिकले. कोवळ्या वयातच पाणक्या म्हणून, गाडीचा क्लिनर म्हणून त्यांनी काम केले. नंतर मुंबईत गिरणी कामगार म्हणून नोकरी केली. पण, त्या ठिकाणी कामगारांचे शोषण पाहून त्यांनी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला. अशिक्षित कामगारांच्या मनावर क्रांती गोंदवली जावी यासाठी त्यांनी ढोलकी हातात घेतली. पुढे ते कामगारांचे पुढारी झाले.
पुढे वाचा, कसे पडले शाहीर अमर शेख नाव...