आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग खान शाहरूखच्या नजरेत भारतीय लोक भ्रष्ट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याच्या नजरेत काय भारतीय लोक भ्रष्ट आहेत? हा प्रश्न त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेला आला आहे. शाहरूख खानने एका प्रमोशनल कार्यक्रमात बोलताना म्हटले की, जेव्हा भारतीय भ्रष्टाचार करतात तेव्हा ते तोपर्यंत करतात जोपर्यंत ते पकडले जात नाहीत.


नुकतेच शाहरुख खानवर देशात खूप चर्चा झाली. यानंतर शाहरूखने म्हटले होते की, यापुढे आपण धार्मिक अथवा राजकीय मुद्यांवर भाष्य करणार नाही. शाहरूखने कमल हासनचा चित्रपट "विश्वरूपम" आणि कश्मिरी मुलींच्या रॉक बॅंडवरुन झालेल्या वादाच्या वेळी हे मत मांडले होते.

शाहरूखला जेव्हा विचारले होते की, 'प्रगाश रॉक बॅंड' मधील सहभागी मुलींना तू काय संदेश देशील ज्यांच्या गाण्याला सार्वजिनक रित्या इस्लामच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे, यावर किंग खान म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला धार्मिक आणि राजकीय विषयावर भाष्य करायचे नाही. मात्र मी अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा पुरस्कर्ता आहे.

जेव्हा शाहरूखला विचारण्यात आले की, अखेर समाजात का असहिष्णुता वाढत चालली आहे यावर शाहरुख म्हणाला, मी एक कलांवत आहे. माझ्याशी चित्रपटाबाबत बोला. जर तुम्ही गंभीर मुद्यांवर चर्चा करु इच्छिता तर आपण त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मत घेतले पाहिजे. मी एक अभिनेता असून माझ्यासारख्यांकडून अशा पश्नांच्या उत्तरे मागितली नाही पाहिजेत.