आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या IASच्या आदेशामुळे तुटणार शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅनचा रॅम्प!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी अखेर शाहरूख खानच्या मन्नत या बंगल्याबाहेरील रॅम्प तोडून टाकण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवड्याभरात हा रॅम्प शाहरूखला हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. वांद्य्राला माऊंट मेरी चर्चकडे जाणारा रस्ता अडवून अभिनेता शाहरुख खानने रॅम्प बनविला आहे. आज (शुक्रवारी) शाहरुखला कारवाईची नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांची मुदत देऊन नंतर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या रॅम्पच्या जागेवर भविष्यात त्याला त्याची व्हॅनिटी व्हॅन पार्क करता येणार नाही. इतर कारगाड्या लावण्यासही बंदी घातली गेली आहे.
शाहरुखने वांद्रे येथील त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याशेजारी त्याची व्हॅनिटी कार पार्क करण्यासाठी रॅम्प बांधला होता. त्यामुळे माऊंट मेरीकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला होता. त्याबाबत पालिकेकडे तक्रारही केली होती; मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. भाजप खासदार पूनम महाजन यांच्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्त कुंटे यांनी अखेर हे रॅम्प तोडण्याचे आदेश दिले आहेत.
वांद्र्यात प्रत्येक महिन्यात भरत असलेल्या यात्रेमुळे हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र, हा रस्ता बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास होत होता. स्थानिक रहिवाशांनी या रॅम्पला हटविण्याची मागणी वेगवेगळ्या माध्यमातून करीत होते. एका स्वयंसेवी (एनजीओ) संस्थेनेही याबाबत आवाज उठवला होता. मात्र, यश मिळाले नव्हते. मात्र, मागील आठवड्यात काही स्थानिक नागरिकांनी या भागातील भाजपच्या खासदार पूनम महाजन यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. तसेच हा रस्ता कसा सार्वजनिक आहे व त्याचा वापर शाहरूख बेकायदेशीर कसा करीत आहे याची कागदपत्रे दाखवून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. पूनम महाजन यांनी याची तत्काळ दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना कारवाई करण्याची मागणी केली.
कोण आहेत सीताराम कुंटे-
1985 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले कुंटे यांचा जन्म बिहारमधील पाटण्यात 1961 मध्ये जन्म झाला. आयएएस परीक्षेत देशात ते पाचव्या रॅंकवर राहिले होते. त्यामुळे त्यांना फेव्हरिट असे महाराष्ट्र केडर मिळाले. दिल्ली विद्यापीठातील अर्थशास्त्राचे ते विद्यार्थी राहिले आहेत. 1984 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यांची पहिली पोस्टिंग 1987 मध्ये धुळे येथे झाली होती.
वडील पण होते आयएएस अधिकारी-
पाटणा, रांची, हैदराबाद यासारख्या बड्या शहरात सीताराम यांचे लहानपण गेले. त्यांचे वडीलही आयएएस अधिकारी राहिले आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला हे ज्या हैदराबादस्थित शाळेत शिकले त्या शाळेत कुंटे यांनीही शिक्षण घेतले आहे.
पुढे पाहा, PHOTOS...