आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahrukh Khan Insulting Indian Flag Case Investigation Pending

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रध्वज अवमान; शाहरुखविरोधी तपास थंडावला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रध्वज अवमान कायद्यांतर्गत अभिनेता शाहरुख खान याच्यावर मागील वर्षी गुन्हा नोंद झाला होता. मात्र या प्रकरणी अजूनही तपास सुरू असल्याचे पोलिस सांगत आहेत. या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने बुधवारी आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

14 ऑगस्ट 2012 रोजी शाहरुख खान याने मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रध्वज उलटा फडकावला होता. लोकजनशक्ती पार्टीचे कार्यकर्ते रवींद्र ब्रह्मे यांनी याप्रकरणी पुण्यातील चतुशृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. पुणे पोलिसांना हा गुन्हा पुढे बांद्रा पोलिस स्टेशनकडे (मुंबई) वर्ग केला. गुन्हा नोंद होऊन वर्ष उलटले, मात्र तपासात कोणतीही प्रगती झाली नसल्याचे ब्रह्मे यांनी माहिती अधिकार कायद्याखाली मागविलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी उपोषण केले.

शाहरुख खान यांच्यावर बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये कलम 2 एल / राष्ट्रप्रतिष्ठा अवमान प्रतिबंधक कायदा सन 2005 अन्वये गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे, अशी माहिती ब्रह्मे यांना दिली आहे.

सामान्य नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास तत्परतेने कारवाई होते. मात्र, शाहरुख अभिनेता असल्यामुळे त्याला वेगळा न्याय लावला जात आहे, असा आरोप ब्रह्मे यांनी केला. याप्रकरणी पोलिसांचा निषेध करण्यासाठी ब्रह्मे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आझाद मैदानावर लाक्षणीक उपोषणही केले.