आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shakti Mill Rape Case News In Marathi, Nashik Remond, Divya Marathi

शक्ती मिलप्रकरणी दोघे अल्पवयीन दोषींची नाशिकच्या सुधारगृहात रवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शक्ती मिलमध्ये छायापत्रकार आणि टेलिफोन ऑपरेटर युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधार न्यायमंडळाने दोषी ठरवले आहे. या दोन्ही आरोपींच्या वर्तनात बदल व्हावा यासाठी त्यांना नाशिकच्या बोस्टन स्कूल या सुधारगृहात पाठवले जाणार आहे.
पुढील तीन वर्षे हे अल्पवयीन आरोपी या सुधारगृहात राहतील. मुंबईच्या शक्ती मिल भागात छायाचित्रणासाठी गेलेल्या एका मासिकाच्या 22 वर्षीय महिला छायापत्रकारावर या भागातील पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. तत्पूर्वी, यातील काही आरोपी टेलिफोन ऑपरेटर युवतीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातही सहभागी होते. या दोन्ही वेगवेगळ्या घटनांत दोषी आढळलेले विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी या तीन आरोपींना मुंबईच्या एका स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.