आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्ती मिल गॅंगरेप प्रकरणी चारही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शक्ती मिल परिसरात गेल्या वर्षी एका टेलिफोन ऑपरेटर तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना सत्र न्यायालयाने आज (शुक्रवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आज सरकार व बचाव पक्षातर्फे युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने शिक्षा सुनावली. बचाव पक्षाने हे चारही आरोपी घरातील एकमेव कमावते असल्याने कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली होती. मात्र, कोर्टाने चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
विजय जाधव (19), मोहम्मद कासीम हाफीज शेख ऊर्फ कासीम बंगाली (21), मोहम्मद अन्सारी (28) आणि अश्फाक शेख या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
गेल्या वर्षी छायाचित्रकार महिला शक्ती मिलमध्ये कामानिमीत्त गेली असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर आणखी एका टेलिफोन ऑपरेटर तरूणीने आपल्यावरही शक्ती मिलमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती, या दोन्ही प्रकरणांमधील आरोपी एकच होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही सामुहिक बलात्काराच्या घटनांमध्ये कोर्टाने आरोपींना दोषी ठरविले होते. आज त्यांच्या शिक्षेवर सुनावणी झाली व शिक्षा सुनावली गेली आहे.
शक्ती मिलमध्ये बलात्काराच्या दोन घटना घडल्या होत्या. पहिली घटना गेल्या वर्षी 31 जुलै रोजी ऑपरेटर तरुणीवर सामूहिक बलात्काराची होती. तर, दुसरी घटना 22 ऑगस्ट रोजी घडली होती. एका छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी, सिराज रहमान अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही प्रकरणात पीडितेच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली.
शिक्षा सुनावल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, चारही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबईत आजपर्यंत घडलेल्या घटनेत पहिल्यादांच मरेपर्यंत शिक्षा सुनाविण्यात आली आहे. फोटो जर्नालिस्ट तरूणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. कारण दोन्ही घटनेतील आरोपी एकच आहेत. तसेच घटनेत नमूद आहे की जर आरोपींनी एकपेक्षा अधिक गुन्ह्यात दोषी आढळला तर त्यांना मरेपर्यंत जन्मठेपीची तरतूद आहे.

पुढे वाचा, काय आहे हे प्रकरण आणि गृहमंत्री आर आर पाटील यांची प्रतिक्रिया...