आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्ती मिल गॅंगरेपप्रकरणी फोटोग्राफर तरूणीलाही न्याय मिळणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या वर्षी मुंबईतील शक्ती मिल येथे एका फोटोग्राफर पत्रकार तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार आहे. मात्र, सरकारी वकिलांनी दोषींवर आणखी इतर कलमे लावण्याची विनंती कोर्टाकडे केली. त्यावर कोर्टाने ती मान्य करीत 376- ई हे नविन कलम टाकले. त्यामुळे याबाबत नव्याने सुनावणी घेतली जात आहे. त्यामुळे या दोषींची आजची शिक्षा कदाचित उद्यावर गेली आहे.
टेलिफोन ऑपरेटर तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी याच आरोपींना तीन दिवसापूर्वी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या दोन्हीही घटनांत विजय जाधव, कासिम बंगाली, सलीम अन्सारी आणि सिराज रेहमान हे आरोपी दोषी आढळले आहेत. त्यामुळे फोटोग्राफर तरूणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी या आरोपींना पुन्हा मरेपर्यंत जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळे या तरूणीला न्याय मिळेल असे बोलले जात आहे. दरम्यान, या सुनावणीसाठी गृहमंत्री आर आर पाटील हे स्वत: सत्र न्यायालयात आज हजर झाले होते.