आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SHALA Novel Is Now Available In English Language Also

‘शाळा’ कादंबरीचा आता इंग्रजीतूनही अनुवाद, मुखपृष्ठावर चित्रपटातील अंशुमन व केतकी यांचे चित्र ,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शाळा’ या मिलिंद बाेकील यांच्या गाजलेल्या कादंबरीचा आता इंग्रजी अनुवादही पुस्तकविश्वात दाखल झाला आहे. दिग्दर्शक सुजय डहाके यांनी या कादंबरीवरील चित्रपट गाजवल्यानंतर आता हार्पर काॅलिन्स पब्लिशर्स इंडिया यांनी केलेले इंग्रजी अनुवादही वाचकांना पुन्हा आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमायला लावणार आहे.

चार वर्षांपूर्वी सुजय डहाके यांनी केतकी माटेगावकर आणि अंशुमन जाेशी या बालकलाकारांना घेऊन ‘शाळा’ चित्रपट काढला हाेता. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली. त्यानंतर शाळा या मराठी कादंबरीसही पुन्हा एकदा मार्केटमध्ये मागणी वाढली हाेती.

आता या कादंबरीचा विक्रांत पांडे यांनी इंग्रजीत अनुवाद केला असून हार्पर काॅलिन्स या प्रतिष्ठित प्रकाशनाने या कादंबरीचे प्रकाशन केले आहे.

मुखपृष्ठावर चित्रपटातील नायक-नायिका अंशुमन जाेशी आणि केतकी माटेगावकर यांचे चित्र आहे. या कादंबरीचा प्रकाशनसाेहळा मुंबईत या महिनाअखेरीस क्राॅसवर्ड येथे हाेणार आहे. बाजारात मात्र हे पुस्तक दाखल झाले आहे.
शाळा चित्रपट गाजला
सुजय डहाके दिग्दर्शित शाळा चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. शालेय जीवनात कोवळ्या बालकांच्या मनात चालणारी घालमेल डहाके यांनी सुंदररीत्या चित्रित केली होती. या चित्रपटातील केतकी माटेगावकर हिची शिरोडकर आणि अंशुमनची जोशाची भूमिका प्रचंड गाजली.