आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shani Shingnapur Temple:Woman Elected President Of Trust

परंपरेला ब्रेक : शनी मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी प्रथमच महिला विराजमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अनिता चंद्रहास शेटे यांची निवड झाली आहे. - Divya Marathi
शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अनिता चंद्रहास शेटे यांची निवड झाली आहे.
मुंबई- शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अनिता चंद्रहास शेटे यांची निवड झाली आहे. शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची निवड झाली आहे. शेटे यांची 6 जानेवारी रोजी ट्रस्टचे सदस्य निवड झाली होती.
काय आहे इतिहास
- 6 जानेवारी समितीचे सदस्य निवडल्यानंतर आज प्रथमच बैठक झाली.
- शनी शिंगणापूर मंदिराच्या 400 वर्षाच्या इतिसाहासत प्रथमच दोन महिला सदस्य झाल्या आहेत. 11 सदस्य समितीत अनिता शेटे व शालिनी लांडे यांची निवड झाली होती.
- असिस्टंट चॅरिटी कमिश्नर यांनी मंदिराच्या 11 ट्रस्टीची नावे जाहीर केली. यात अनिता शेटे व शालिनी लांडे या दोघींची नावे होती.
- या दोघींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्या गृहिणी आहेत.
ट्रस्टला झुकावे लागलेच...
- निवडणुकीत 97 लोकांनी सहभाग घेतला होता. यात 10 महिलांचा समावेश होता. महिलांनी सहभाग घेण्यास अनेक पुरुषांनी विरोध केला मात्र महिला आडून राहिल्या.
- मंदिराच्या मंडळ व समितीने या 10 महिलांची मुलाखत घेतली. त्यानंतर शेटे व लांडे यांना ट्रस्टमध्ये घेण्यास पात्र ठरवले. मागील बुधवारी या दोघींच्या नावाची घोषणा झाली होती.

ट्रस्टने का घेतला निर्णय...
- जेव्हा मंदिराचे शुद्धीकरण सुरु होते तेव्हाच मंदिराच्या ट्रस्टच्या निवडणुकीची तयारी सुरु होती.
- शुद्धीकरण करणे महिलांचा अपमान झाल्याचे मानले गेले. विधानसभेत यावरून गोंधळ झाला. महिला आमदारांनी हा भेदभाव असल्याचे सांगितले.
- देशभरात याला महिलांनी विरोध केला. सोशल मिडियातही यावर चर्चा झडली व ही परंपरा चुकीचे असल्याचे सांगितले.
- त्याच वेळी काही महिलांनी ट्रस्टवर जाण्याचा निर्णय घेतला.
का केले शुद्धी करण शुद्धीकरण?
- दोन महिन्यांपूर्वी 29 नोव्हेंबरला एका महिलेने सुरक्षा तोडून मंदिराच्या चौथा-यावर जाऊन दर्शन घेतले. यानंतर खूप वाद झाला.
- महिलेने घेतलेल्या दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आता पुढे काय...
ट्रस्टमध्ये महिलांची वर्णी लागल्यानंतर महिला संघटनांचे म्हणणे आहे की, यापुढची आमची लढाई सर्व महिलांना चौथा-यावर दर्शन घेता यावे यासाठीची असेल.
पुढे स्लाईडद्वारे पाहा शनी देवाचा फोटो...