आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिशिंगणापूरप्रकरणी विराेधकांनी विचारला जाब- सरकार कुणाच्या पाठीशी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अहमदनगर िजल्ह्यातील शनिशिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावर भूमाता िब्रगेडच्या तृप्ती देसाई यांना जाण्यापासून रोखल्याबद्दल विराेधी पक्षाच्या अामदारांनी साेमवारी विधान परिषदेत फडणवीस सरकारला जाब िवचारला. ‘सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार आहे की नाही याचा खुलासा करा,’ अशी मागणी करत िवरोधी सदस्यांनी सरकारविरोधात जाेरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिषदेचे कामकामज दोन वेळा तहकूब करावे लागले.

काँग्रेसच्या संजय दत्त यांनी या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव सादर केला होता. दत्त म्हणाले, ‘उच्च न्यायालयाने सर्वच मंदिरांत पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश देण्याचे निर्देश दिले अाहेत. या आदेशानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शनिमंदिरात गेल्या असता त्यांना प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला. स्थानिक महिलांनी देसाई यांना धक्काबुक्की केली. देसाई सध्या रुग्णालयात आहेत. जिल्हा प्रशासनानेही देसाई यांना योग्य ते संरक्षण उपलब्ध करून िदले नाही,’ असा आरोप केला.

विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, ‘मंदिर प्रवेशाबाबत गेले अनेक महिने राज्यात चर्चा होते आहे. महिलांना सर्व मंदिरांत प्रवेश दिला जावा, असे उच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. तरी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नाही. सरकारची भूमिका नेमकी कोणती आहे? सरकार महिलांच्या बाजूने आहे की शनिशिंगणापूर ग्रामस्थांच्या, याचा खुलासा करावा,’ अशी मागणीही त्यांनी केली. तर ‘देवेंद्र फडणवीस सरकार हिंदू जनजागृती समिती अाणि सनातन संस्था यांच्या इशाऱ्यावर चालत अाहे. त्यामुळे राज्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाचेसुद्धा प्रशासनाकडून पालन होत नाही,’ असा आरोप राष्ट्रवादीच्या िवद्या चव्हाण यांनी केला.
पाठीशी अाहात तर अडवता का? विराेधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘महिलांना मंदिरातील प्रवेशाबाबत सरकारचा विरोध नाही. सरकार महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.’ मात्र ‘मग तृप्ती देसाईंना का अडवले?’ असे प्रश्न विराेधी अामदारांनी उपस्थित केले. त्यावर सत्ताधारी व विराेधी बाकावरून परस्परविराेधी घाेषणाबाजी सुरू झाली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आले.
‘भारतमाता की जय’वरून वादंग तहकुबीनंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर पुढील विषयाचा स्थगन प्रस्ताव नियमाप्रमाणे मांडता येईल का, हे पाहण्यासाठी मी तो राखून ठेवत आहे, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सांगितले. मात्र, स्थगन प्रस्तावाचा किमान विषय कोणता आहे, याची माहिती तरी सांगू द्या, असा आग्रह िवरोध सदस्यांनी धरला. संजय दत्त बोलण्यास उठले. स्थगनचा िवषय ‘भारतमाता की जय’ या घोषणेसंदर्भातील आहे, असे त्यांनी सांगताच सत्ताधारी बाकावरून घोषणाबाजी सुरू झाली. पुन्हा गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुसऱ्यांदा दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

‘भाविकांना संरक्षण द्या’
शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना संरक्षण देण्याबाबत सरकार व पाेलिसांना द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका पुण्यातील हेमंत पाटील यांनी हायकाेर्टात दाखल केली अाहे. अादेशानंतरही महिलांना संरक्षण का देण्यात अाले नाही? याबाबत सरकार व पाेलिसांकडून खुलासा घ्यावा, अशी मागणीही करण्यात अाली.
तृप्ती देसाई रुग्णालयात
पुणे | भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना साेमवारी सकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अाता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी शिंगणापुरात गेलेल्या देसाई यांना स्थानिक महिलांनी धक्काबुक्की केली हाेती.