आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Address NCP Meeting In Alibaugh News In Marathi

‘जाणत्या राजा’ने घेतला ‘वेध भविष्याचा’, राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील भाजप सरकारच्या विश्वास ठरावावेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिले. मात्र याचा अर्थ सरकार टिकवण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. हा इशारा देतानाच त्यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेतही दिले आहेत.

राष्ट्रवादीने पाठिंबा देऊ करूनही तो स्वीकारण्याची हिंमत फडणवीस सरकारमध्ये नसल्यामुळे चार-सहा महिन्यांत राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे भाकीतही पवारांनी वर्तवले. आधी न मागता भाजपला पाठिंबा देऊन खळबळ उडवणाऱ्या पवारांनी मंगळवारी मध्यावधी निवडणुकांचे संकेत देऊन राजकीय वर्तुळात आणखी एक बॉम्बगोळा टाकला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वेध भविष्याचा’ या दोनदिवसीय चिंतन शिबिराला मंगळवारपासून अलिबागमध्ये सुरूवात झाली. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व मोजक्या, पण महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या शिबिरात सध्याची राजकीय परिस्थिती व पक्षाने पुढे काय करावे, याबाबत मार्गदर्शन पवारांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. बहुमत नसणाऱ्यांनी, पण सत्तेवर आलेल्यांनी शहाणपणाने पावले टाकली तर सर्व काही ठिक राहील. मात्र चुकीचे निर्णय घेतले आणि वादग्रस्त निर्णयात लक्ष घातल्यास त्यांचे काही खरे नाही हे लक्षात ठेवावे, असा इशाराही पवारांनी भाजपला दिला.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करुन वाचा, शरद पवार म्हणाले- भ्रष्टाचाराच्या आरोपांची खुशाल चौकशी करा!