आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Address NCP Meeting In Alibaugh News In Marathi

अस्वस्थ पवारांचा सत्तेसाठी ‘बॉम्ब’; भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होण्याची भीती?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘अल्पमतात असूनही सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शहाणपणाने पावले टाकावीत. पूर्वीच्या वादग्रस्त प्रकरणांत लक्ष घालू नये, अन्यथा सरकार पडून मध्यावधी निवडणुका होऊ शकतात,’ असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सत्ताधारी भाजपला दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठीच पवारांनी कसरत सुरू केलेली आहे; परंतु भाजप थेट पाठिंबाही घेत नाही सत्तेत सहभागाविषयी ठोस आश्वासनही देत नाही, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पवारांनी मध्यावधीचा ‘बॉम्बगोळा’ टाकून त्याचे पडसाद काय उमटतात ते पाहण्याची भूमिका घेतली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपने राष्ट्रवादीचा तटस्थ पाठिंबा घेतला असला, तरी तो अजूनही ते जाहीरपणे बोलून दाखवत नाहीत. याउलट आमची शिवसेनेसोबत चर्चा सुरू असून लवकरच त्यांना सत्तेत घेतले जाईल, असे फडणवीसांसह भाजपचे मंत्री दिवसाआड बोलताना दिसतात. यामुळे पवारांची अस्वस्थता वाढत चालली आहे. एक वेळ पवारांना सत्ता मिळेल की नाही, याची पर्वा वाटत नाही. मात्र, सर्वात जास्त भीती वाटते ती आपल्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फाइल्स फडणवीस सरकारने उघडल्या तर काय होईल याची. काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी भ्रष्टाचाराची चौकशी सुरूच राहील, अशी घोषणा केली होती.
१) पहिली गोष्ट म्हणजे भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पवारांनी असा निर्णय घ्यायला घ्यायला नको होता, असे ते खासगीत बोलत आहेत. याशिवाय माध्यमांमधूनही राष्ट्रवादीवर जोरदार टीका होत असल्याने पक्षातील एक गट तसेच पदाधिकारीही निराश झाले आहेत. ही निराशा दूर करण्यासाठी भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये, असा इशारा देऊन पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

२) दुसरी गोष्ट म्हणजे भाजपवर दबाव वाढवण्याची. भाजप लवकरच शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्याच्या चर्चेला आता वेग आलेला आहे. हिवाळी अधिवेशनानंतर शिवसेनेला आठेक मंत्रिपदे देण्याचा भाजपचा विचार आहे. तसे झाल्यास भाजपला पाठिंबा दिल्याने पत गेलीच; पण सत्ताही मिळाल्याचा दुहेरी फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. हे सर्व लक्षात घेऊन राष्ट्रवादीला लवकर सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी पवार भाजपवर दबाव वाढवत असल्याचे बोलले जाते.

एकाच दगडात दोन पक्षी
सिंचन, सार्वजनिक बांधकाम, सहकार अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची मोठी यादी आहे. या आरोपांची शहानिशा झाल्यास राष्ट्रवादीचे काही नेते तुरुंगातही जाऊ शकतात. त्यामुळे पक्षाला मोठा फटका बसू शकतो. नेते, पदाधिकारी कार्यकर्ते सैरभैर होतील, अशी भीती पवारांना वाटते. सत्ता हाच राष्ट्रवादीचा पाया आहे अाणि सत्ता नसेल, तर नेते कार्यकर्त्यांना एकसंध ठेवणे फारच कठीण होऊन जाईल. यामुळेच मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा बाॅम्ब टाकून पवारांनी दोन गोष्टी साधल्या आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कन्या सुप्रियांच्या मंत्रिपदाचीही स्वप्ने