आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा निर्यातबंदी नको : कृषिमंत्री शरद पवारांची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गगनाला भिडलेल्या किमती कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ग्राहक व्यवहार आणि वाणिज्य मंत्रालय सध्या कांदा निर्यातीवर बंदी घालण्याच्या विचारात आहे, परंतु केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मात्र या निर्यातबंदीला आपण अनुकूल नसल्याचे मत व्यक्त केले.

जागतिक पातळीवरील कांदा पुरवठादार म्हणून असलेल्या भारताच्या प्रतिमेला यामुळे तडा जाण्याची शक्यता असून त्यामुळे आपण निर्यातीबाबत अनुकूल नाही. महाराष्ट्रासह काही प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याचा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कांद्याच्या किमतीत वाढ होण्याची ही तात्पुरती परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षात देशातील कृषी मालाची निर्यात वाढून 2.33 लाख कोटींवर गेली. त्याअगोदरच्या वर्षात ही निर्यात 1.86 लाख कोटी रुपयांची झाली होती. यंदाच्या पहिल्या तिमाहीत 5,11,616 टन म्हणजे 776.47 कोटी रुपयांची निर्यात झाली होती. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत 5,17,274 टन निर्यात झाली होती.