आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार-दीपक केसरकर कोकणात एकाच मंचावर ! विधानसभेसाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभेच्या ‘निकाला’चा अंदाज आल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पटकावण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ओरोस येथील कृषी भवनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह निलंबित आमदार दीपक केसरकर व इतर पदाधिकारी एकाच व्यासपीठावर येत आहेत.
काँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांचा प्रचार न करण्याची ताठर भूमिका आमदार केसरकर व राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकार्‍यांनी घेतली होती. शरद पवारांनी आवाहन करूनही त्यांनी राणे पिता-पुत्रांना ‘हात’ दिला होता. यामुळे केसरकरांसह इतरांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता विधानसभेत कोकणात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी झाले-गेले विसरून जात राष्ट्रवादीने निलंबित पदाधिकार्‍यांनाही पुन्हा पक्षात सक्रिय करण्याची मोहीम सुरू केली आहे.
कोकणात सध्या राष्ट्रवादीचे सात-आठ आमदार आहेत. त्यातच पदाधिकार्‍यांवर कठोर कारवाई केल्यास किंवा त्यांची नाराजी दूर न केल्यास विधानसभेला पक्षाला फटका बसू शकतो. ही बाब लक्षात घेऊनच नाराज पदाधिकार्‍यांना गोंजारण्याचे काम करण्यात येत आहे.