आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योगपती गौतम अदानींसाठी शरद पवारांचे लॉबिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे समजण्यात येणारे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी आता दस्तूरखुद्द शरद पवार यांनी लॉबिंग सुरू केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर अदानींना खुश करतानाच मोदींनाही खुश करण्याची पवारांची खेळी असल्याचे मानले जात आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली या बैठकीला स्वत: पवार आणि अदानी यांनी खास हजेरी लावली. त्यामुळे मंत्रिमंडळाची रात्री वाजताची नियोजित बैठक तासभर लांबणीवर पडली. गोंदिंया जिल्ह्यात अदानींचा औष्णिक विद्युत प्रकल्प सुरू झाला आहे.

प्रकल्पातील ६६० मेगावॅटचे दोन संचही कार्यान्वितही झाले. मात्र अडथळ्यांमुळे तिसरा संच अद्याप कार्यान्वित नाही. मोदींशी अदानींची जवळीक आणि पवारांचे मोदींशी उत्तम राजकीय संबंध लक्षात घेता या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी पवार यांच्यात गुप्त समझोता झाल्याची टीका होत होती. त्या पार्श्वभूमीवर पवारांचा हा पुढाकार चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, बीडच्या पाणीप्रश्नावरून राज्यमंत्री सुरेश धस यांची कृष्णा खोरे मंत्री शशिकांत शिंदे यांच्यात खडाजंगी झाली.