आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश दर्शनाच्या निमित्ताने शरद पवार राणेंच्या भेटीला, नारायण राणे NCP मध्ये जाण्याची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पवार- राणे भेटीबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, सध्या गणेशोत्सव सुरू आहे. राणे यांनी पवार साहेबांना गणपती दर्शनासाठी आमंत्रण दिले होते. त्यामुळे पवार यांनी राणे यांच्या निवासस्थानी सपत्नीक भेट दिली.

उभयतांना मराठा आरक्षणाबाबत चर्चा करायची असल्यास ते कुठेही भेटू शकतात. त्यामुळे ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. अलीकडेच पवार यांनी अॅट्राॅसिटीबाबत वक्तव्य केले होते. कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभरात मराठा संघटनांचे विशाल मोर्चे निघत आहेत. या भेटीत याबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशी सुरु झाली आहे चर्चा
नारायण राणे सध्या कॉंग्रेसमध्ये आहे. पण कॉंग्रेसची देशातील आणि महाराष्ट्रातील परिस्थिती सर्वश्रृत आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या महत्त्वाकांक्षेला मर्यादा आल्या आहेत. तसेही कॉंग्रेस सत्तेत असताना राणे यांना मर्जीनुसार पदे मिळालेली नव्हती. भविष्यात कॉंग्रेस सत्तेत आली तरी महत्त्वाची पदे पदरात पडण्याची शक्यता कमीच आहे. याचा राणेंना जुना अनुभवही आहे. त्यामुळे नारायण राणे आता राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरु झाली आहे.
पवारांचा पॉवर गेम
राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्ष सत्तेबाहेर आहे. राष्ट्रवादीला महत्त्वाकांक्षी नेत्यांचा पक्ष असे म्हटले जाते. सत्तेबाहेर असल्याने पक्षाला एकसंध ठेवण्याचे पवारांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे ते सतत काही ना काही करुन पक्षातील नेत्यांना व्यस्त ठेवत असतात. नारायण राणे राष्ट्रवादीत आले तर पक्षाला एक नवीन ऊर्जा मिळेले. शिवाय पक्षातील नेत्यांना पवारांच्या क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती येईल.
मराठा आरक्षणाने वाढली शरद पवार आणि नारायण राणे यांची जवळीक... वाचा पुढील स्लाईडवर....
बातम्या आणखी आहेत...