आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुबेहुब...! शरद पवार, आशा भोसले यांच्या मेणाच्या पुतळ्यांचे अनावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महात्मा गांधी, अॅडॉल्फ हिटलर, नरेंद्र मोदी, प्रभुदेवा या जगातील दिग्गजांचे मेणाचे पुतळे साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार सुनील कंडलोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विख्यात पार्श्‍वगायिका आशा भोसले या महाराष्ट्रातील दोन महान व्यक्तिमत्त्वांचे हुबेहूब मेणाचे पुतळे तयार केले आहेत. या पुतळ्यांचे अनावरण मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब हाऊसमध्ये बुधवारी समारंभपूर्वक करण्यात आले. येत्या काही दिवसातच या दोघांचे पुतळे लोणावळा येथील "सेलिब्रिटी वॅक्स मुझ्यियम" मध्ये झळकणार आहेत.
शरद पवार यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आशा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तर, आशा भोसले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कलाकार सुनील कंडलोर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, गटनेते जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार व आशाताईंनी एकमेंकाच्या आठवणींना उजाळा दिला.

येत्या काही दिवसात बॉलिवूडचे महानायक ‘बिग बीअमिताभ बच्चन व क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे मेणाचे पुतळे बनवण्याचा ध्यास केला आहे असे सुनील कंडलोर यांनी यावेळी सांगितले. इतर देशांप्रमाणे भारतातही वॅक्स म्युझिअम असावं हे स्वप्न बाळगून सुनील कंदलूर यांनी लोणावळा येथे भारतातलं पहिलं वॅक्स म्युझियम उभारलं. गेली 15 वर्षापासून मेणाच्या पुतळ्याचं शिल्प साकारत असताना राजकारणात हीरो असलेल्या शरद पवार साहेबांचा मेणाच्या पुतळा साकारावा अशी इच्छा होती. आजपर्यंत ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. तो दिवस आज आल्याचा आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया सुनील कंडलोर यांनी दिली.
दोन महान व्यक्तींनी केले एकमेंकांचे कौतूक-
सूर्य-चंद्र असेपर्यंत लता मंगेशकर व आशा भोसले यांचा सुरेल आवाज अबाधित राहील आणि आशाताईंचा हा मेणाचा पुतळा असंख्य युवकांना गाण्याच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत शरद पवार यांनी आशाताईंचे कौतूक केले. आशाताईंनी शरद पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. पवारसाहेब ज्यावेळी आजारी होते त्यावेळी एकांतात ते 'कानडा वो विठ्ठलू' हे माझं गाणं ऐकत होते. गाणं ऐकल्यावर साहेबांनी मला फोन केला. माझं कौतुक केलं. त्यावेळी इतकं धन्य झाल्यासारखं वाटलं की पैसा, महल या गोष्टींना आयुष्यात किंमत नसेल पण आपल्या कार्याचं कोणी कौतुक केलं तर आयुष्याचं सार्थक झाल्याप्रमाणे वाटतं. यानंतर मी साहेंबाना भेटायला गेले तेव्हा त्यांनी माझा मेणाचा पुतळा करायला सांगितला. साहेबांनी सांगितल्यानंतर माझा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला. देशात मी पहिलीच गायिका असेल जिचा मेणाचा पुतळा आहे तो मान मला मिळाला त्याबद्दल आशा भोसले यांनी साहेबांचे आभार मानले.
पुढे पाहा, शरद पवार, आशा भोसले यांच्यासारखेच दिसणारे त्यांचे हुबेहुब पुतळे...
बातम्या आणखी आहेत...