आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तृत्ववान मोदींना कोणाचे नाव घेण्याची गरजच काय, शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘गुजरातमध्ये अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास शिकवणा-या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन छत्रपतींच्या नावाने मते मागू नयेत,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली. मोदींचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांना खरे तर कोणाच्या नावाने मते मागण्याचा अधिकार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘छत्रपतींच्या नावाने मते मागताना भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा विडा उचलला दिसतो. गुजरात सर्व क्षेत्रात आघाडीवर असून महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याचे हे सर्वजण रेटून खोटे बोलत आहेत. पण प्रत्यक्षात आज गुजरातच्या तुलनेत सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र पुढे आहे. सरसंघचालकांचे दस-याचे भाषण दूरदर्शनवरून दाखवून मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर केला असल्याचेही पवार म्हणाले. दरम्यान, आर. आर. पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही पवारांनी नाराजी व्यक्त केली. मात्र त्यांनी माफी मागितल्यामुळे हा विषय येथेच संपवावा, असेही पवार म्हणाले.