आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील निर्णयप्रकिया ठप्प- शरद पवारांचे मुख्यमंत्र्यावर पुन्हा शरसंधान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकार निष्क्रिय असून राज्यातील निर्णयप्रकिया ठप्प झाली आहे. त्यामुळे येथील उद्योगधंदे बाहेर चालले आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री चव्हाण हे कमालीच्या संथ गतीने राज्यातील निर्णय घेत आहेत. यावर विरोधी पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस व स्वपक्ष काँग्रेसमधूनही चव्हाणांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. तरीही चव्हाण यांनी आपल्या कामाची व निर्णयाची गती वाढवली असल्याचे दिसून येत नाही. मुख्यमंत्र्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसलेल्या पवारांना आणखी एक आयती संधी मिळाली. राज्यातून नुकताच एक प्रोजेक्ट परराज्यात गेला. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, राज्यातील निर्णयप्रकिया कमालीची ठप्प झाली आहे. दरम्यान, काँग्रेसने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, शरद पवारांनी याबाबत जाहीर टीका करण्याची गरज नाही. त्यांचा पक्षही राज्यात आमचा सहकारी म्हणून सत्तेत सहभागी आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आंध्र, कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्‍ट्र दुष्काळ पाठपुराव्यात मागे: पवार
कॅगच्या अहवालाकडे दुर्लक्ष करू नये : शरद पवार
सरकार चालवताना समन्वय आवश्यक; शरद पवार यांचे प्रतिपादन