आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Chided Rr Patil Repeatedly For His Tobacco Habit

आर.आर.पाटील यांना तंबाखू सेवनाबद्दल शरद पवारांनी अनेकदा टोकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/सांगली - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर.पाटील उर्फ आबा यांच्यावर त्यांच्या अंजनी गावी हेलिपॅड ग्राऊंडवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचे पार्थिव मार्केटयार्ड मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी आले होते. 58 व्या वर्षी आबांचे कँसरमुळे निधन झाले आहे. त्यांना तंबाखू सेवनाची सवय होती. त्यांची ही सवय सुटावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यापासून त्यांचे कार्यालयीन कर्मचारी आणि जनसंपर्क अधिकारी जयंत करणजावकर त्यांना वारंवार सांगत असायचे.

आबांचे पीआरओ राहिलेले करणजावकर यांनी सांगितले, की शरद पवारांनी त्यांच्या सवयीबद्दल त्यांना अनेकवेळा टोकले होते, मात्र त्यांची सवय सुटली नाही. त्यांनी व्यसन सोडावे म्हणून राष्ट्रवादीतील नेत्यांनी खूप प्रयत्न केले. अजित पवार नेहमी म्हणत "आबा, बस्स झाली तंबाखू. तुमचा रुमालही पिवळा झालाया...' मात्र, हे व्यसन काही सुटले नाही. आबांच्या कार्यालयातील शिपायांनीही बर्‍याचवेळा समजावले. त्यांनी अनेक गोष्टी ऐकल्या, ही एकच गोष्ट मनावर घेतली नाही.
जयंत यांनी सांगितले, की साहेब (आबा) जेव्हा जेव्हा हातावर तंबाखू घेत होते तेव्हा मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करायचो. मात्र, ते त्यांची ती जुनी सवय होती. ते त्यांच्या जवळ बसलेल्या मित्रांकडून घेऊन तंबाखू सेवन करतच होते. जयंत करणजावकर हे 2000 पासून 2009 पर्यंत त्यांचे पीआरओ होते. 2005 मध्ये काही काळासाठी त्यांनी ही सवय सोडली होती, मात्र 2009 मध्ये करणजावकर निवृत्त झाले त्यांनतर आबांनी पुन्हा तंबाखूची सुरु केली.
करणजावकर यांनी सांगितले, की आबा अनेक तास तोंडात तंबाखू ठेवून काम करत असायचे. दिवसभरात साधारणपणे 200 पेक्षा जास्त लोकांना ते भेटत होते. ऑफिसमधून सगळे लोक गेल्यानंतरही ते पाहात असायचे की, कोणाला भेटायचे राहून गेले तर नाही ना. मुंबईतील मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानी 15 वर्षे ते एकटेच राहात होते. त्यांचे कुटुंबिय गावी राहात होत. आज त्यांच्या अंत्ययात्रेत जाण्याचीही माझ्यात शक्ती नसल्याचे करणजावकर यांनी सांगितले.
आजाराकडे केले दुर्लक्ष
आबांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे, की त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष्य केले होते. प्रकृतीवर जेवढे लक्ष दिले पाहिजे तेवढे ते ठेवू शकत नव्हते. विधानसभा निवडणुकीआधीपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. काही महिन्यांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना लवकरात लवकर ऑपरेशन करुन घेण्याचा सल्ल दिला होता. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. निवडणुक झाल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यात बराच काळ निघून गेला आणि आजार बळावला होता. कँसरच्या उपचारादरम्यानच त्यांना ह्रदयविकाराचा झटका देखील आला होता. यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी होत गेले. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. शरद पवारांनीही त्यांना वेळेवर उपचाराचा सल्ला दिला होता. स्वतः शरद पवार यांना देखील कँसर होता मात्र त्यावर त्यांनी वेळेवर उपचार केला. यामुळेच ते आजही राजकारणात सक्रिय आहेत. मात्र त्यांचा सल्लाही आबांनी मनावर घेतला नव्हता.

पुढील स्लाइडमध्ये, अंजनी गावावर शोककळा