आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेम धरून ‘गेम’ साधण्यात पवारांचा ‘हात’खंडा; ‘क्लीन चिट’नंतर मोदींवर पुन्हा टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही दिवसांपूर्वीच गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदींना ‘क्लीन चिट’ देणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर नेम साधत राजकीय ‘गेम’ साधण्याचा हातखंडा दाखवून दिला. आघाडीतील जागा वाटपापूर्वी ‘मोदी भेटी’ची बातमी पेरणारे पवार 22 जागा पदरात पाडून घेतल्यानंतर पुन्हा ‘धर्मनिरपेक्ष’ झाल्याने राजकीय वतरुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता, तेव्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात दंगलींप्रकरणी मोदी यांना न्यायालयांनी विविध खटल्यांमध्ये निदरेष सोडल्याचे मत व्यक्त करून त्यांना पक्षातर्फे एकप्रकारे ‘क्लीन चिट’च दिली होती. पवारांनीही पटेल यांच्या वक्तव्याचे सर्मथन केले होते. काही दिवसांनी मोदी व पवार यांची गुप्त भेट झाल्याच्या बातम्याही प्रकाशित झाल्या. राष्ट्रवादीच्या गोटातूनच ही बातमी ‘पेरण्या’त आल्याची चर्चा आहे. या भेटीचे खंडन करतानाच पवारांनीही आम्हाला कोणीही अस्पृश्य नसल्याचे सांगितले होते. याचाच परिणाम म्हणजे राष्ट्रवादीला केवळ 16 जागा देण्यावर अडून बसलेल्या काँग्रेसने थेट लोटांगण घालत जुनाच फॉर्म्युला मान्य करावा लागला.
सत्यपालसिंहांवर नाराजी
अपेक्षेप्रमाणे 22 जागा पदरात पडल्यानंतर मात्र पवारांना आता धर्मनिरपेक्षतेची आठवण झाली. यातूनच मुंबईतील अल्पसंख्याक मेळाव्यात त्यांनी शनिवारी पुन्हा एकदा गुजरात दंगलीचा उल्लेख करून मुस्लिम व्होटबँक जपण्याचे प्रयत्न केले. मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह हे भाजपमध्ये गेल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.