आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोरण नसल्याने उद्योग राज्याबाहेर, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - योग्य उद्योग धोरण न अवलंबल्याने राज्यात येऊ शकणारे हजारो कोटींचे उद्योग दुस-या राज्यात गेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात योग्य उद्योग धोरणांची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरावा, असे आदेश आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. तसेच देशात थेट विदेशी गुंतवणकीला योग्य वातावरण असल्याने सर्वच क्षेत्रात त्यासाठी परवानगी द्यावी आणि पेट्रोल, डिझेल, रोहयो आणि पीडीएसवरील सबसिडी रद्द करावी असे परखड मतही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेश अध्यक्षांची निवड आणि कार्यकर्त्यांचा मेळावा यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी मधुकरराव पिचड यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी राज्य आणि केंद्रातील निर्णय आणि योजनांवर सविस्तरपणे मते व्यक्त केली. शरद पवार म्हणाले की, सध्या युरोपीय देशांमध्ये प्रचंड आर्थिक संकट आहे आणि चीन व भारत याचा पुरेपूर वापर करून स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारू शकतात. परंतु आपल्याकडेही आर्थिक संकट दिसू लागले आहे. विकासदर 5.5 टक्क्यांवर आला आहे. पेट्रोल, डिझेल, रॉकेल, रोहयो आणि पीडीएस योजनांवर 4 कोटी 54 लाख रुपयांची सबसिडी दिली जाते. त्यामुळे विकासकामांना पैसे मिळत नाहीत असे सांगून त्यांनी सबसिडी रद्द केली पाहिजे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
पवार म्हणाले की, डिझेलवरील मर्सिडीझ वापरणा-याला सबसिडीची गरज नसून शेतक-यांना पंपासाठी डिझेल वा गरिबांना रॉकेलसाठी सबसिडीची गरज आहे. रोहयोमुळे शेतक-यांना मजूर मिळत नाहीत. त्यामुळे रोहयोच्या योजनांमध्ये शेतक-यांच्या शेतात काम देऊन 50 टक्के सबसिडी दिल्यास 20 हजार कोटी रुपये वाचतील असेही त्यांनी सांगितले.
थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी
परदेशात आर्थिक संकट असल्याने देशातील विविध उद्योगांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली पाहिजे, असे सांगून शरद पवार म्हणाले की, यामुळे देशातील आर्थिक स्थिती सावरण्यास मदत होईल. टीम अण्णांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाने किमान हमी किंमत धोरण स्वीकारले आहे त्यानुसार गव्हाची खरेदी करण्यात आली. या वर्षी देशात अन्न-धान्याचे विक्रमी उत्पादन झाले.
45 लाख टन तांदूळ, 25 लाख टन साखर आणि 1 लाख 25 कापसाच्या गाठी
निर्यात करण्यात आल्या. निर्यात करूनही आपल्याकडे मोठा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी यूपीएबरोबर
दुधाचे विक्रमी उत्पादन झाल्याने दुधभुकटीच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. देशावर आर्थिक संकट असताना फक्त शेतकरीच या संकटातून आपल्याला बाहेर काढेल असेही त्यांनी सांगितले.नंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रपती निवडणुकीत आपण यूपीएबरोबरच असून राष्ट्रपतिपदासाठी जो उमेदवार निवडला जाईल त्याला आम्ही समर्थन देऊ. राज्यात काँग्रेस एकटे लढण्याचा विचार करीत असल्याबद्दल विचारता ते म्हणाले की, त्यांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि नंतरच त्याबाबत निर्णय घेऊ.
‘मारुती’ची गुजरातेत कोटींची उड्डाणे
शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्यांनी केला केवळ देखावा आणि गाजावाजा
‘दादांचा आदर्श ठेवा’; परदेशवारीवरून शरद पवारांनी उपटले नेत्यांचे कान