आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवतोय\' हे वक्तव्य वर्षातील सर्वात मोठा विनोद- पवारांचा CM ना टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनी आज सकाळी कराड येथे पुष्पांजली अर्पण करताना शरद पवार... - Divya Marathi
यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनी आज सकाळी कराड येथे पुष्पांजली अर्पण करताना शरद पवार...

कराड- मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचे काम हे सरकार करतेय, असे आपल्या भाषणात म्हटले होते. त्याला आपल्या खास शैलीत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा विनोद असल्याचे टीकास्त्र शरद पवारांनी सोडले.  भाजप सरकार फसवे आहे तर फसव्या लोकांसोबत शिवसेना संसार कसे काय करतेय? एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा, अशी टीका शरद पवार यांनी शिवसेनेवर केली आहे.

 

शरद पवार आज कराडमध्ये आहेत. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व नेते कराडमध्ये पोहचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सरकारविरोधात 1 ते 12 डिसेंबरदरम्यान यवतमाळ ते नागपूर या दरम्यान हल्लाबोल आंदोलन करणार आहे. भाजपचे सरकार उलथावून टाकण्यासाठी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे महाराष्ट्रात सरकार आणण्यासाठी या हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात आज यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगावातून म्हणजेच कराडमधून झाली. यासाठी कराडमध्ये पोहचलेल्या पवारांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले सोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला.

 

पवार म्हणाले, उद्धव ठाकरे जाहीर सभांत सांगतात की, हे सरकार फसवे सरकार आहे. मग फसव्या सरकारसोबत तुम्ही काय करताय. तुम्हाला एकत्र नीट नांदता येत नसेल तर वेगळं होऊन सोडचिठ्ठी का देत नाही. एकीकडे सरकारवर टीका करायची आणि दुसरीकडे सत्ता उपभोगायची हे योग्य नाही. लोकांना हे रूचत नाही, अशी टीका पवारांनी केली.

 

उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरात भाजपवर टीका करताना सत्तेला कधीही लाथ मारू असे सांगितले होते. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी मी राज्याचा दौरा करत आहे. जनतेच्या व्यथा-वेदना जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संसद, विधानसभेत आवाज उठविणार आहे. मात्र, त्यातूनही समस्या सुटल्या नाहीत तर सत्तेला लाथ मारू अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली होती. हाच संदर्भ घेऊन पवारांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

 

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी कराड येथे प्रितीसंगमावर पोहचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव यांच्या विचाराने राज्य पुढे नेत असल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावरही भाष्य करत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने हे सरकार चाललयं असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर तो एक मोठा विनोदच आहे. शेतक-यांना कर्जमाफी अद्याप दिली नाही आणि ती देण्याआधीच सरकार हे जाहिराती करत सुटले आहे. फडणवीस आधी म्हणायचे ३५ हजार कोटींची कर्जमाफी देणार, आता सांगताहेत ६ हजार कोटींची कर्जमाफी देणार. पण अद्याप 100 कोटींचीही कर्जमाफी झालेली नाही. हे सरकार आता घालविण्याची वेळ आली आहे असे पवारांनी सांगितले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, शरद पवार व मुख्यमंत्री यांचे कराड दौ-यातील छायाचित्रे....

बातम्या आणखी आहेत...