आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Critics On Anna Hazare On His Stand Of Land Bill

मी अध्यक्षपदी होतो हे अण्णा हजारेंना कळाले तर ते भूमिका बदलतील- शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- 2013 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने तयार केलेल्या भू-संपादन विधेयकातील तरतुदींचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी समर्थन केले आहे. या प्रश्नांवर पत्रकारांनी शरद पवारांना अहमदनगरमध्ये छेडले असता पवारांनी आश्चर्य व्यक्त केले. ते ( अण्णा हजारे) असे बोलले?... असा लांबलचक पॉज घेऊन पवार म्हणाले, बहुधा त्यांना (अण्णांना) त्या विधेयकाच्या मसुदा समितीचा मी अध्यक्ष होतो हे माहित नसावे. ते माहित झाल्यानंतर कदाचित 10-15 दिवसांनी ते वेगळी भूमिका घेतात की काय ते पाहावे लागेल असे उपरोधिक भाष्य माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्याच्या भू-संपादन विधेयकाला विरोध करून आपली भूमिका मांडणारे पत्र धाडले आहे. या पत्रात अण्णांनी मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारने 2013 साली मंजूर केलेल्या भूसंपादन विधेयकामुळे शेतक-यांचे समाधान झाले होते. जयराम रमेश यांनी यावर तीन वर्षे काम करून शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे 2013 च्या मूळ भूसंपादन विधेयकात बदल करू नये असे मोदींना पाठवलेल्या पत्रात अण्णांनी मत मांडले होते.
या पार्श्वभूमीवर एसटीच्या कार्यक्रमासाठी अहमदनगरमध्ये आलेल्या पवारांना पत्रकारांनी छेडले. त्यावेळी पवारांनी अण्णांविषयी फार भाष्य करण्यास टाळले. मात्र ते म्हणाले, ज्या भूसंपादन विधेयकाचे ते समर्थन करीत आहे ती विधेयक मसुदा समितीचा मी अध्यक्ष होतो हे त्यांना कदाचित माहित नसेल असे तिरकस भाष्य केले. मात्र अण्णांना मी त्या समितीचा अध्यक्ष होतो हे माहित झाल्यावर ते मत बदलतील असा टोला लगावला. भू-संपादन विधेयकाच्या विरोधातील अण्णांच्या प्रस्तावित आंदोलनासोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
पुढे वाचा, ग्रामीण महाराष्ट्राची ओळख असलेल्या 'एसटी'साठी सर्वस्व पणाला लावेन- शरद पवार...