आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Critics Once Again On Narednra Modi At Beed

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देशाच्या ऐक्यास सुरुंग- शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई (बीड)- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचे ऐक्य धोक्यात येईल असे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बीडमधील गेवराई येथे केले. बीडचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. यावेळी सुरेश धस, धनंजय मुंडे उपस्थित होते. धस आणि मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली.
शरद पवार म्हणाले, गेल्या दशकात गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेले जातीयवादी दंग्यात विशिष्ट एका समाजाला लक्ष्य केले गेले. या दंगली रोखता आल्या असत्या. मात्र तसे होताना दिसले नाही. या दंग्याला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून मोदींकडेच ही जबाबदारी जाते असे पवार म्हणाले. त्यामुळे विशिष्ट एका गटाचे ओढा असलेले नेतृत्त्व देशाच्या ऐक्याला सुरुंग लावेल. त्यामुळे लोकांनी जबाबदारीने याकडे पाहिले पाहिजे असे सांगत भाजपला विजयापासून रोखा असे आव्हान केले.
यावेळी सुरेश धस यांनीही मुंडे यांच्यावर टीका केली. धस म्हणाले, गोपीनाथ मुंडे गेली सहा महिने दंड थोपटत होते. आहे का कोणी मैदानात. राष्ट्रवादीला माझ्याविरोधात उमेदवार मिळेना. पण गावातील यात्रेच्या आधी कुस्ती धरण्याची आम्हाला सवय नाही. त्यासाठी यात्रा यावी लागते, सबिना फिरावा लागतो. आता यात्राही आली आणि सबिनाही फिरला आहे. आता मी कुस्ती खेळायला आलो उतरलो आहे व मुंडे यांना चितपट करणार आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, बीडमध्ये लबाड विरूद्ध खरा अशी लढाई आहे. जर ऑलिपिंकमध्ये याचा समावेश केला उद्याचे माजी खासदार नक्कीच भारताला बक्षीस मिळवून देतील असे म्हणत काका गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच माझ्या परळी तालुक्यातून राष्ट्रवादीला भाजपपेक्षा एक तरी जास्त मत मिळवून देऊ असे शरद पवारांच्या उपस्थितीत सांगितले.