आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Demands To Highcourt Transfer Petition Of Mca Election

शरद पवार मुंडेंना घाबरले, \'एमसीए\'चा दावा दुस-या कोर्टात वर्ग करण्यासाठी हायकोर्टात धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अध्यक्षपदाच्या निवडीला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई सेशन्स कोर्टात आव्हान दिले होते. मात्र आता हा दावा दुस-या कोर्टात वर्ग करावा अशी मागणी "एमसीए"चे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी हायकोर्टात केली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी "एमसीए"चे नियम व मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशनच्या तरतूदींच्यातंर्गत दावा दाखल केला आहे. सेशन्स कोर्टाने नोटीफ ऑफ मोशनच्या सुनावणीदरम्यान या नियमाचा सर्वकष अन्वयार्थ काढल्याने आता हा दावा दुस-या कोर्टात वर्ग करण्यात यावा अशी मागणी पवार यांनी कोर्टाकडे एका अर्जाद्वारे केली आहे. आता या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
भाजपचे नेते व मुंबईतील "एमसीए" क्लबचे सदस्य असलेल्या मुंडेंनी "एमसीए" अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र मुंबईच्या बाहेरचे रहिवासी असल्याचे सांगत मुंडेंचा अर्ज बाद केला होता. या निर्णयाच्या विरोधात मुंडेंनी सेशन्स कोर्टात धाव घेतली होती. अर्ज अवैध ठरविण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. दरम्यान, तोपर्यंत इतर कोणाचा अध्यक्षपदासाठी अर्ज नसल्याने पवार यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
यानंतरही निर्णय प्रलंबित असेपर्यंत पवार यांनी "एमसीए"च्या अध्यक्षपदाची कामे करण्यास मनाई करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली होती. सेशन्स कोर्टाने त्यांची मागणी मान्य करीत पवारांना अध्यक्षपदाची कामे करण्यास मनाई केली. मात्र पवारांनी हायकोर्टात धाव घेतली व तेथे त्यांना दिलासा मिळाला होता. आता पवारांनी मुंडेंवर कुरघोडी करीत मुंडेंचा दावा आता दुस-या कोर्टात वर्ग करावा, अशी मागणी केली आहे.