आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Demands To Modi & Fadanvis Govt To Help Farmers

PHOTOS: बळीराजाच्या रास्त मागण्यांसाठी जानता राजा पुन्हा सरसावला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतक-यांचा नेता अशी शरद पवार यांची देशभर ओळख आहे. ही ओळख का व कशी झाली याचे उदाहरण गुरुवारी पुन्हा एकदा दिसून आले. गेल्या महिन्यात घरात तोल जाऊन पडल्याने पायाला फ्रॅक्चर झाल्याने पवार जखमी झाले होते. या आजरपणामुळे पवार सध्या विश्रांती घेत आहेत. त्यांच्या पायाचे प्लॉस्टर काढले असले तरी त्यांना अद्याप व्यवस्थित चालता येत नाहीये. तरीही त्यांनी लोखंडी रॉडचा आधार घेत शेतक-यांना मदत मिळावी म्हणून पत्रकार परिषद घेऊन सरकारला फटकारले व आपली शेतक-यांप्रती किती निष्ठा आहे ते दाखवून दिले.
 
गुरुवारी संक्रांत, संक्रांतीचा सण शेतक-यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. यंदाचे वर्ष कसे जाणार याची याचदिवशी आवर्जून वेगवेगळ्या माध्यमातून बळीराजा माहिती घेतो. शेतक-याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या पवारांनी हाच क्षण ओळखून व चालताही येत नसताना शेतक-यांच्या बिकट परिस्थितीबाबत भाष्य करून सरकारला जागे करण्याचे काम केले. पवारांनी यावेळी राज्यातील ऊस, दुध, कापूस आणि फळबागायतदारांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करून सरकारच्या भूमिकेबाबत काही मुद्दे उपस्थित केले.
 
पुढे वाचा, जानता राजा पवारांनी सरकारला कोणत्या मुद्यांवरून घेरले....