आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Chief Sharad Pawar Discharged From Mumbai Hospital

शरद पवारांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शरद पवार 2 डिसेंबरच्या रात्री दिल्लीतील घरी घसरून पडल्याने त्यांच्या पायाला फॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी 3 डिसेंबरला पवारांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील 15-16 दिवसापासून त्यांच्यावर तेथे उपचार सुरु होते.
10 दिवसापूर्वी पवारांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर चालता येत नसल्याने पवारांनी रूग्णालयातच विश्रांती घेणे पसंत केले. अखेर आज पवारांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रूग्णालयातून डिस्चार्ज दिला तरी डॉक्टरांनी पवारांना आणखी 8-10 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पवार पुढील एक-दोन आठवडे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे कळते. पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी त्यांची भेट पुढील काही दिवस टाळावी असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.