आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Files Nomination Form For Rajyasabha On 24 Jan.

शरद पवार शुक्रवारी राज्यसभेचा अर्ज भरणार, दुस-या उमेदवाराबाबत उत्सुकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 24 जानेवारीला राज्यसभेसाठी अर्ज भरणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार कोण याचा अद्याप निर्णय झाला नसल्याचे पक्षाच्या वर्तुळात उत्सुकता आहे. दुस-या जागी पवारांनी मुस्लिम चेहरा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाकडून तिघांची नावे पुढे करण्यात आली आहेत. यात पक्षाचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध वकील माजिद मेमन, प्रदेश प्रवक्ते व माजी मंत्री नवाब मलिक व राज्यमंत्री फौजिया खान यांच्यापैकी एकाचे नाव पुढे येणार आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार फौजिया खान यांच्यासाठी आग्रही आहेत. आगामी लोकसभेच्या 22 जागांपैकी सुप्रिया सुळे व सुर्यकांता पाटील वगळता पक्षाकडे एकही महिला उमेदावर लोकसभा निवडणूकीत लढण्याची शक्यता नाही. त्याचवेळी मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आगामी लोकसभेत त्या विजयी होतील की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे दिल्लीत सुळे यांच्याबरोबर आणखी एखादा महिला चेहरा असावा अशी यामागे भूमिका आहे. तसेच फौजिया खान यांना राज्यसभेवर पाठविले तर मुस्लिम चेहरा व महिला असा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.