आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharad Pawar Had “backstabbed” Sonia Gandhi In 1999 Kv Thomos Book Recount

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवारांनी सोनियांच्या पाठीत खंजीर खुपसला, थॉमस यांच्या पुस्तकात आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सन 1999 साली लोकसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेले शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेस नेते व केंद्रीय अन्न पुरवठामंत्री के. व्ही. थॉमस यांनी आपल्या 'सोनिया -द बिलव्हेड ऑफ द मासेस' या पुस्तकात केला आहे. ज्या सोनिया गांधींनी पवारांना काँग्रेसचे लोकसभेतील सर्वोच्च असे विरोधी पक्षनेतेपद बहाल केले होते त्याच पवारांनी सोनियांच्या विदेशी असण्याचा मुद्दा उकरून बंड केले यामुळे काँग्रेस पक्षातील इतर नेत्यांप्रमाणे आपल्यालाही मोठा धक्का बसला होता असेही थॉमस यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
थॉमस यांचे 'सोनिया-द बिलव्हेड ऑफ द मासेस' या इंग्रजी अनुवाद असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन संरक्षणमंत्री ए. के. अॅंटोनी यांच्या हस्ते व ग्रामीणविकासमंत्री जयराम रमेश, मंत्री शशी थरूर यांच्या उपस्थितीत येत्या 20 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. थॉमस यांनी आपल्या मल्याळी या मातृभाषेत 2006 साली 'सोनिया प्रियंकारी' नावाचे पुस्तक लिहले होते. त्या पुस्तकाचा आता इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे. या पुस्तकात 1998 सालातल्या काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी, रसातळाला गेलेला काँग्रेस पक्ष, सोनिया गांधींना पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची केलेली विनंती व त्यानंतर घडलेल्या घटना, संगमा-अन्वर-पवार या त्रिकुटाने सोनियांच्याबाबतीत विदेशी मुद्दा उपस्थित करून पक्षात कसे बंड केले यावर स्वतंत्र एक प्रकरण लिहून प्रकाशझोत टाकला आहे.
पुढे वाचा, थॉमस यांनी आणखी काय म्हटले आहे शरद पवारांविषयी...