आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar In Action, 31 Spokeperson Change From Party, 3 4 Ministers May Drop Soon

PAWAR IN ACTION: 31 प्रवक्त्यांची उचलबांगडी, पक्षासाठी 18 तास करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लोकसभेतील पराभवाचे पान बंद करून आगामी विधानसभेच्या निवडणुकीला कामाला लागले आहेत. पक्षातील सर्व सूत्रे पवारांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतली असून, प्रत्येक छोट्या-मोठ्या निर्णयात पवारांचा सहभाग असणार आहे. याचाच पहिला अंक म्हणून पक्षाच्या 31 प्रवक्त्यांची उचलबांगली केली आहे. तसेच मोजक्याच प्रवक्त्यांची निवड केली आहे.
यात सुप्रिया सुळे, आर आर पाटील, जयंत पाटील, अंकुश काकडे, शशिकांत शिंदे, वंदना चव्हाण आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. याबाबत सांगितले जात आहे की, या प्रवक्त्यांनी पक्षाची बाजू उत्तमपणे माध्यमासमोर मांडली नाही. पराभवामागे हे ही एक कारण मानले गेले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणा-या व मंत्रीपदावर समाधानकारक मंत्र्यांना डच्चू जून महिन्यात दिला जाणार आहे. यात राज्यमंत्री फौजिया खान यांच्यासह तीन-चार जणांचा समावेश आहे.
आज दुपारी दोन वाजता शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षनेत्यांसोबत आढावा बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मंत्री, खासदार, लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी लोकसभेतील पक्षाची खराब कामगिरी, संबंधित भागातील, विभागातील कोणते समाजघटक विरोधात गेले व ते का गेले यासह मतदारांची भावना काय होती व आहे हे समजून घेण्यात आले. तसेच यापुढे लोकांच्या अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी पक्षाने धडाडीने कामाला लागले पाहिजे. यासाठी पक्षाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवारांनी सांगितले. त्यासाठी पक्षीय पातळीवर व संघटनात्मक बदल करण्याचे संकेत पवार आपल्या नेत्यांना व पदाधिका-यांना आजच्या बैठकीदरम्यान दिले.
पवार म्हणाले, आता पराभव झाला म्हणून निराश होऊ नका. 1977 साली इंदिराविरोधी लाटेनंतर परिस्थिती लगेच निवळली होती. आताही तसेच होऊ शकते. पण त्यासाठी परिश्रम करा. मी स्वत 18 तास पक्षसंघटनेसाठी काम करणार आहे. तुम्हीही लोकांसमोर जा. बडेजावपणा टाळा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या दोन वेगवेगळ्या निवडणुका असतात. त्यामुळे पुन्हा आघाडीला लोक नाकारतील ही मनातील भीती काढून टाका.
वरिष्ठ नेत्यांना संघटनात्मक पातळीवर लक्ष घालण्यास सांगण्यात येणार आहे. अशा स्थितीत छगन भुजबळ यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. मागील 4-5 वर्षात पवार केंद्रात मंत्री असल्याने पक्षाची दोरी अजित पवारांकडे सैल सोडली होती. मात्र, आता पक्षाला फटका बसताच अजित पवारांकडून सर्व सूत्रे काढून घेण्यात येणार आहेत. मागील विधानसभेला अजित पवारांच्या म्हणण्यानुसार तिकीट वाटप झाले होते. यंदा मात्र मोठे पवार स्वत: जातीने लक्ष घालणार आहेत. तसेच पक्षविरोधी कारवायात गुंतलेल्या कोणालाही माफ केले जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे खायचे आणि दाखवायचे दात वेगळ्या असणा-या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्ष सत्तेत आहे त्यामुळे समाजातील विविध घटकांकडे दुर्लक्ष झाले व ते सर्व विरोधात गेल्याची पवारांना जाणीव आहे. त्यामुळेच पक्षापासून दूर गेलेल्या अशा समाजघटकांना जोडण्याचा पवारांचा आगामी काळात प्रयत्न राहणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने काहीसे निराश झालेल्या प्रफुल्ल पटेलांना पक्षाकडून लागलीच राज्यसभेची खासदारकी दिली जाणार आहे. मावळते केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांच्या जागी ते राज्यसभेवर जाणार आहेत. ते बिहारमधून लोकसभेवर निवडून आले आहेत. तारिक अन्वर हे राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत तसेच त्यांची मुदत मार्च 2016 पर्यंत आहे. दिल्लीतील जबाबदारी तारिक अन्वर, त्रिपाठींसह पटेल यांच्यावर सोपवली जाणार आहे. तर, महाराष्ट्रात स्वत: शरद पवार आणि छगन भुजबळ पक्षमजबुतीचे काम करणार आहेत. अशा स्थितीत अजित पवारांना बॅकफूटवर जावे लागणार आहे. याचबरोबर केवळ कागदावरच प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्ष राहिलेले भास्करराव जाधव, जितेंद्र आव्हाड यांचाही यात नाहक बळी जाण्याची शक्यता आहे. आर आर पाटील, जयंत पाटील, सुप्रिया सुळेंना प्रवक्ते करून सॉफ्ट चेहरे पुढे आणले जाणार आहेत.