आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पॉवर गेम’ साध्य होताच पवारांची मोदींवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणूक जागावाटपात काँग्रेसवर दबाव वाढवण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना गुजरात दंगलीप्रकरणी न्यायालयाने क्लीन चिट दिल्याचे सांगणा-या राष्ट्रवादीने आपले ईप्सित साध्य होताच मोदींवर हल्ला चढवला. गुजरातेतील नरसंहार देशाने पाहिलेला असल्याची टीका शरद पवार यांनी शनिवारी मोदींचे नाव न घेता केली. मोदींचे विकासाचे मॉडेल व देशाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दाव्यावरही पवारांनी प्रश्नचिन्ह उभे केले.
राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या मेळाव्यात पवार म्हणाले की, आमचे शेजारच्या राज्यातील काही लोक देशभर विकासाचा डंका पिटत आहेत. विकास तर सर्वत्र होतच असतो. मात्र तेथे कशा प्रकारे कत्तली झाल्या हे आम्ही विसरलो नाहीत. जातीयवादी काही लोक मनमानी करण्याच्या विचारात आहेत. मात्र, आम्ही हे होऊ देणार नाही. यासाठी राजकारण सोडावे लागले तरी चालेल, अशा शब्दांत पवार यांनी मोदींवर नाव न घेता तोफ डागली.